महाडीबीटी प्रणालीवर कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.23 : कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पिक सन 2020-2021 अंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर सुक्ष्म सिंचन घटकाकरीता निवड झालेल्या शेतकऱ्यांनी 30 जून 2021 पर्यंत कागदपत्रे महाडीबीटी प्रणालीवर अपलोड करावयाची आहेत.
सूक्ष्म सिंचन घटकासाठी प्राप्त 8 हजार 59 अर्जापैकी 5 हजार 344 अर्जांची सोडतीद्वारे निवड झालेली आहे. सोडतमध्ये निवड झालेल्या अर्जापेकी 1 हजार 440 लाभार्थ्यांनी कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केले असून उर्वरीत 3 हजार 904 शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत.
संचालक फलोत्पादन कृषि आयुक्तालय पुणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोडतमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांनी त्याची कागदपत्रे महाडीबीटी प्रणालीवर 30 जून 2021 पर्यंत अपलोड करावी. अन्यथा त्याचे अर्ज महाडीबीटी प्रणालीतून बाद करण्यात येतील असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.
0 Response to "महाडीबीटी प्रणालीवर कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन"
टिप्पणी पोस्ट करा