कै. दिलवरसिंग पाडवी स्मारक स्मृती संस्थेच्या वतीने "पेसा चा वसा" या विषयावर वर्चुअल सभा
तळोदा : येथे जेष्ठ नागरिक संघ, कै. दिलवरसिंगदादा पाडवी स्मारक स्मूर्ती संस्था शहादा यांच्या वतीने पेसा चा वसा या विषयावर व्हर्चुअल सभेत उपस्थित असणाऱ्यांना प्रमाणपत्र व पेसा कायदा पुस्तिका देण्यात आल्या.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ. कांतीलाल टाटीया, जेष्ठ कार्यकर्ते सरपंच यशवंत पाडवी, माजी जि.प. सदस्य जितेंद्र पाडवी, ग्रा.पं. सदस्य प्रकाश वळवी, पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, सरपंच सरदार पावरा , सरपंच रायसिंग वळवी, जेष्ठ कार्यकर्ते छगन कोठारी, राजू पुजारी, दिनेश पावरा, दशरथ तडवी, भुसरा वसावे, पिंट्या पावरा, दिलीप पावरा, तेरसिंग पावरा, भरत पावरा, रवा पावरा, केशव पावरा सामाजिक व ग्रामपंचायतचे सदस्य असे कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमात याप्रसंगी बोलतांना डॉ. कांतीलाल टाटीया यांनी पेसा कायदा यावर सखोल मार्गदर्शन केले. आदिवासी संस्कृती जतन, गाव विकास, गतीविधी, शासकीय कामकाज व योजनांवर नियंत्रण, गौण खनिज वनोउपोज, वनीकरण , गावातील शांतता, सावकारी व्यवहार अश्या सर्वच विषयावर पेसा कायद्याअंतर्गत कशी अंमलबजावणी करू शकतो यावर सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र पाडवी यांनी बोलतांना सांगितले की, पेसा अंतर्गत होणारा विकासात्मक गावाचा होत असलेल्या बदलाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पं. स.सदस्य दाज्या पावरा यांनी केले. कार्यक्रमात गुलाब वळवी, धनंजय पाटील, सुभाष ठाकरे, उदेसिंग वसावे , रतीलाल पावरा यांचे अनमोल सहकार्य लाभले
0 Response to "कै. दिलवरसिंग पाडवी स्मारक स्मृती संस्थेच्या वतीने "पेसा चा वसा" या विषयावर वर्चुअल सभा"
टिप्पणी पोस्ट करा