
पालकमंत्री ॲड. के.सी पाडवी यांचा नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रम
तळोदा : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार 21 जून 2021 रोजी मुंबई येथून असली ता. धडगांवकडे प्रयाण व असली येथे मुक्काम. मंगळवार 22 जून 2021 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत असली ता. धडगांव येथे राखीव. दुपारी 2 वाजता असली येथून नंदुरबारकडे प्रयाण. बुधवार 23 जून 2021 रोजी नंदुरबार येथे राखीव.
गुरुवार 24 जून 2021 रोजी सोईनुसार नंदुरबारहून शहादाकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता शहादा येथे काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सोईनुसार शहादा येथून नंदुरबारकडे प्रयाण.
शुक्रवार 25 जून 2021 रोजी दुपारी 3 वाजता नंदुरबार येथे काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सायं. 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आढावा बैठक. सायंकाळी 6 वाजता जिल्हा रुग्णालय येथे भेट. रात्री सोयीनुसार नंदुरबारहून मुंबईकडे प्रयाण.
0 Response to "पालकमंत्री ॲड. के.सी पाडवी यांचा नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रम"
टिप्पणी पोस्ट करा