
कामाची गुणवत्ता न सुधारल्यास ठेकदाराला काळ्या यादीत टाका : सीमा वळवी जि.प अध्यक्षा नंदुरबार
तळोदा : दुर्गम भागाला मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत होत असलेले काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे आरोप धजापाणी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी व माजी क्रीडामंत्री पदमाकर वळवी यांच्या कडे केला. याबाबत त्यांनी व्यथा मांडली असता स्वतः जी,प, अध्यक्षा व माजी मंत्री पदमाकर वळवी यांनी या रस्ताची पाहणी केली,
या पाहणी दरम्यान बेता पावरा , गब्बरसिंग पावरा, गोपी पावरा,गोण्या पावरा, मगन ठाकरे, अंबुलाल वळवी, हरीश खर्डे, संजय खर्डे, बाळूसिंग पावरा, सचिन राहसे, युवराज वळवी धजापाणी गावातील व पाड्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
धजापाणी या दुर्गम भागात रस्ते नसल्याने आरोग्य, शिक्षण व इतर मुलभूत सुविधांचा या ठिकाणी अभाव आहे. हे पाहता २०१८ साली पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून कोटीचा निधी मंजूर झाला व कामाला सुरुवात झाली दरम्यान मधील काळात वन विभागाच्या अडचणी आल्या त्या दूर होऊन अवघे 4 वर्ष उलटले तरीही काम अत्यंत संथ तथा निकृष्ठपणे सुरू आहे.
निकृष्ट काम -
या घाटमाथ्याच्या रस्त्यावर एकूण नऊ फरशी पूल असून त्यात एक मोठ्या सरंक्षण भिंतीच कामात सिमेंट ऐवजी माती भरल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांनी हाताने माती काढत या बाबतीत नाराजी व्यक्त केली, दुर्गम भागात होणाऱ्या रस्ताचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी आरोप केला.
प्रतिक्रिया***
दुर्गम भागाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम इतकं निकृष्ट व संथपणे होत असल्यास निश्चितच हि गँभिर बाब असून सातपुडयाचा दुर्गम भागाला बारमाही रस्ते आवश्यक असून करोडो रुपयांचा निधी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत होणाऱ्या या कामा बाबत सूचना देऊनही त्याची दखल ठेकदाराने न घेतल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे.
सीमा वळवी
जिल्हा परिषद अध्यक्षा
प्रतिक्रिया***
संबधित ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असुन आवश्यक त्या ठिकाणी फरशी पूल टाकण्यात येतील तसेच ज्या ठिकाणी माती निघात आहे ते बांधकाम तोडण्याचा सूचना ठेकदारला देण्यात आल्या आहेत,
भूषण चौधरी
अभियंता
प्रधान मंत्री ग्राम सडक योजना
प्रतिक्रिया ***
आमच्या गावात बारमाही रस्ता नसून चार वर्षांपासून कामाला सुरुवात झाली असून आम्हला सुरुवातीला खूप आनंद झाला होता आता मात्र ठेकदार मनमानी पद्धतीने काम करत असून असे काम परत परत होत नसते त्यामुळ त्यामुळे कामात गुणवत्ता असावी पावसाळ्यात देखील रस्ता सुरू राहावा या करिता फरशी पूल आवश्यक त्या ठिकाणी तयार करण्यात यावे.
बेता पावरा
ग्रामस्थ धजापाणी
0 Response to "कामाची गुणवत्ता न सुधारल्यास ठेकदाराला काळ्या यादीत टाका : सीमा वळवी जि.प अध्यक्षा नंदुरबार"
टिप्पणी पोस्ट करा