
तळोदा शहरात विना मास्क मिळून आला एकावर पोलिसात गुन्हा दाखल
तळोदा: शहरात फॉरेस्ट नाक्याजवळ जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेशाचे उल्लंघन करीत विना मास्क मिळून आला दि.17 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास एक जण आढळला तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी प्राप्त माहिती अशी कि, तळोदा फॉरेस्ट नाक्याजवळ सार्वजनिक जागी दिं.17 जून रोजी दुपारी 12 वाजता सुमारास विक्रम रुमा वळवी रा. घोडमग ता.तळोदा हा सार्वजनिक जागी मास्क न लावता फिरतांना आढळून आला व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. म्हणून तळोदा पोलिसात दोघाविरुद्ध भादवी कलम 188, 268, 269, 290 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. युवराज चव्हाण हे करीत आहे..
0 Response to "तळोदा शहरात विना मास्क मिळून आला एकावर पोलिसात गुन्हा दाखल"
टिप्पणी पोस्ट करा