
आप की जय बहुउद्देशीय संस्था अंमलपाडातर्फे पथनाट्याच्या माध्यमाने राणीपुर येथे कोविड-19 लसीकर जनजागृती
तळोदा:- तळोदा तालुक्यातील राणीपुर येथे आप की जय बहुउद्देशीय संस्था अंमलपाडा, तर्फे पथनाट्याच्या माध्यमाने कोविड-19 लसीकरणाचे जनजागृती केली. जीवन सुंदर हाय या वाक्याने लोकांना लसीकरणासाठी स्थानिक बोली भाषेत जनजागृती करण्यात येत आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दरबारसिंग पाडवी, राणीपुर ग्रा.पं. सदस्य प्रकाश वळवी यांच्या उपस्थित पथनाट्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना यशवंत वळवी यांनी केली. पथनाट्य कलाकार यशवंत वळवी (अंमलपाडा), विलास वसावे (सोरापाडा), संजय ढुमकुल (धनपूर ), प्रदीप गावीत (खेरवा नवापूर), कृष्ण पाडवी (मेंढवण), रमेश वसावे भाई (सोरापाडा), कमलेश वळवी (अंमलपाडा), अजय वसावे (अंमलपाडा), रजनीश वसावे (मेंढवण), मेहमुद मोरे (सावरपाडा), अभिमन्यु पाडवी (गणेश बु) या सर्वांनी कलाकारांनी कार्यक्रमाची यशस्वीरित्या केले. कार्यक्रमात आभार पिंटू गावीत यांनी केला.
0 Response to "आप की जय बहुउद्देशीय संस्था अंमलपाडातर्फे पथनाट्याच्या माध्यमाने राणीपुर येथे कोविड-19 लसीकर जनजागृती"
टिप्पणी पोस्ट करा