अवैद्यरित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
तळोदा: विना परमिट गावठी हात भट्टी 80 लिटर दारू कब्जात बाळगून अवैध विक्री करतांना गणेश बुधावल येथे मिळाल्याने तळोदा पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसात एका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथे विना परमिट गावठी हात भट्टी दारू अवैध विक्री करतांना दिं.22रोजी दुपारी 4:15 वाजता मिळून आला त्याच्या ताब्यात 80 लिटर 1600 रु किंमत दारू जप्त केली पो.ना.राजधर नथ्थु जगदाळे यांच्या फिर्यादीवरून दिलीप आत्र्या वसावे यांच्या विरोधात तळोदा पोलिसात गु.र.नं.391/2021 म.दा.का.कलम 65 (ई) प्रमाणे दाखल झाला असून पुढील तपास पो.ना.पिंटू अहिरे हे करीत आहेत....
0 Response to "अवैद्यरित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल"
टिप्पणी पोस्ट करा