नंदुरबार जिल्ह्यात ११ डिसेंबरपर्यंत मनाई आदेश जारी
नंदुरबार, दि. २७ नोव्हेंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आणि इतर धार्मिक व ऐतिहासिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७(१)(३) अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.
मनाई आदेशाचा कालावधी:
हा आदेश २७ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या मध्यरात्रीपासून ११ डिसेंबर २०२४ पर्यंत लागू राहणार आहे.
काय काय मनाई आहे?
शस्त्र, स्फोटके, लाठ्या किंवा दाहक पदार्थ बरोबर नेणे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव करणे.
कोणत्याही प्रकारचे मिरवणुका, घोषणाबाजी, वादग्रस्त भाषणे किंवा समाजात तणाव निर्माण करतील असे कृत्य.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, बाबरी मशिद घटना आणि विजय दिन यामुळे संभाव्य तणाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणाला सूट आहे?
वृद्ध, अपंग, शासकीय सेवक, लग्न समारंभ, प्रेतयात्रा, तसेच न्यायालयीन कार्यासाठी लागणाऱ्या व्यक्तींना हा आदेश लागू नाही..
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार असून, कायदा सुव्यवस्थेवर सतत लक्ष ठेवले जाईल...
यथार्थ वार्ता न्युज channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VayRu3h1NCrZE2vnHi3Q
0 Response to "नंदुरबार जिल्ह्यात ११ डिसेंबरपर्यंत मनाई आदेश जारी"
टिप्पणी पोस्ट करा