शहादा विधानसभा: पहिल्या फेरीत राजेश पाडवी 700 मतांनी आघाडीवर
शहादा विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत भाजपाचे राजेश पाडवी यांनी 700 मतांची आघाडी घेतली आहे. एकूण 28,926 मते मोजण्यात आली असून त्यामध्ये राजेश पाडवी यांना 14,420 मते मिळाली, तर काँग्रेसचे राजेंद्र गावित यांना 13,726 मते प्राप्त झाली आहेत. अपक्ष गोपाल भंडारी यांनी 339 मते मिळवली, तर नोटाला 441 मते पडली आहेत. मतमोजणीच्या पुढील फेऱ्या निर्णायक ठरणार आहेत.
0 Response to "शहादा विधानसभा: पहिल्या फेरीत राजेश पाडवी 700 मतांनी आघाडीवर"
टिप्पणी पोस्ट करा