संपर्क करा

डिसेंबर मध्ये होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन -हरिष भामरे

डिसेंबर मध्ये होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन -हरिष भामरे

२८ नोव्हेंबर २०२४
नंदूरबार: जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे डिसेंबर 2024 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 2 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 01-00 वाजता जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भामरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


0 Response to "डिसेंबर मध्ये होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन -हरिष भामरे"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article