चार आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला जेष्ठ पत्रकार संघाचा सत्कार सोहळा
तळोदा : मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा आज रोजी तळोदा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या इमारतीत घेण्यात आला..
याप्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून पदवीधर आमदार सुधीर तांबे, शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, निखिल तुरखीया, केसरसिंग क्षत्रिय, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, यांच्यासह सत्कारमूर्ती व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाला प.स.सदस्य विजय राणा, नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, नगरसेवक गौरव वाणी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, बापू कलाल, सतीवन पाडवी, आनंद सोनार, जितेंद्र दुबे, संजय पटेल, जगदीश मगरे, आर.ओ.मगरे, जालंधर भोई, कमलेश पाडवी, संदीप परदेशी , गणेश पाडवी, भरत चौधरी,प्रदीप शेंडे, अमनुदिन शेख, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष निलेशचंद्र सूर्यवंशी, मुख्याध्यापक अजित टवाळे डॉ.किशोर समुद्रे, यांच्यासह डॉ.संघटनेचे अध्यक्ष, सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष व सदस्य, तळोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मराठे व सदस्य, जयसचे अध्यक्ष विनोद माळी व सदस्य, यांच्यासह तळोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक विभागातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार अमरजित बारगळ, श्रीकांतजी पाठक, जगदीश जयस्वाल, रवींद्र चव्हाण, विनोद सूर्यवंशी, भारतसिंग गिरासे, शांताराम पाटील, रविंद्रकुमार जाधव यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आलेल्या विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. पदवीधर आमदार सुधीर तांबे यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाचा आरसा आहे.. देशाच्या विकासासाठी परिपक्व लोकशाहीची गरज आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विकासाला चालना मिळत असते. भारतीय संविधानाला अपेक्षित असणारे स्वातंत्र्य समता बंधुता हे मूल्य पत्रकारितीमुळे समाजात रुजण्यास मदत होते. मूल्याधिष्ठित समाज निर्मितीसाठी पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असून आधुनिक भारताच्या उभारणे मध्ये पत्रकारितेचं मोठे योगदान आहे.
आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पत्रकारिता हे जोखिम पतकरण्याचे माध्यम आहे. वृत्त संकलनाचे कार्य करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते असे सांगून संघाच्या कार्याचे कौतुक केले.
माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आपल्या मनोगतात व्यक्ती ओळख करून देण्याचे काम पत्रकारा मार्फत केलं जाते, विधानसभेत विषय निवडताना आम्हाला पत्रकारांनी लिहून दिलेल्या लेखांचा आधार घ्यावा लागत असल्याचे ते म्हणाले याशिवाय पत्रकारांचे वोरोधातील लिखाण हे मार्गदर्शन असते त्यामुळे लोकप्रतिनिधी देखील पत्रकारांचा लेखनाला सकारात्मक दृष्टीने पाहावे.
माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी आपल्या मनोगतामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनच चरित्राचा लेखाजोगा मांडला आणि त्यांच्या जीवन चरित्र पत्रकारांनी आत्मसात केलं पाहिजे असं मत व्यक्त करत पत्रकार संघातर्फे राबविण्यात येणाऱ्या सुप्त उपक्रमांमुळे समाजाला दिशा मिळत असल्याचे सांगून संघाचे कौतुक केले. सत्कार मूर्ती अमरजीत बारगळ, व रवींद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास मगरे व कालीचरण सूर्यवंशी यांनी केले. प्रस्ताविक दत्तात्रय सूर्यवंशी यांनी तर आभार सुधाकर मराठे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.अशोक वाघ, ईश्वर मराठे, भरत भामरे, मंगेश पाटील, विकास राणे, सम्राट महाजन, हंसराज महाले, किरण पाटील, नरेश चौधरी, नारायण जाधव, महेंद्र लोहार, सुशील सूर्यवंशी, दीपक मराठे, अक्षय जोहरी, महेंद्र सूर्यवंशी, मानसिंग राजपूत, दीपक गोसावी यांनी परिश्रम घेतले....
0 Response to "चार आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला जेष्ठ पत्रकार संघाचा सत्कार सोहळा "
टिप्पणी पोस्ट करा