संपर्क करा

शिवसेनेच्या नगरसेविका व पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकारी यांच्या दालना समोर तीन तास ठिय्या आंदोलन

शिवसेनेच्या नगरसेविका व पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकारी यांच्या दालना समोर तीन तास ठिय्या आंदोलन

तळोदा : पालिकेची आज झालेल्या सभेत शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा दुबे यांनी काही विषयांवर हरकत घेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाच्या प्रवेशद्वाराबाहेर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केल्याने ऑनलाईन झालेली व्हिडीओ कॉन्फररिंगची सभा वादळी ठरली.  सभेत एकूण 14 विषयावर चर्चा करण्यात आली.विषय क्रमांक सहा व विषय क्रमांक अकरा यांवर शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा दुबे यांनी हरकत घेत त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली.दरम्यान पालिकेडून लेखी माहिती उपलब्ध झाल्याने  तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले 

        आज दि.२४ जून २०२१ रोजी तळोदा नगरपालिकेची  सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती.या सभेत नगराध्यक्ष परदेशी यांनी शहराच्या विकास कामास 14 विविध ठराव मांडले त्यात 2022, ओडीएफ, जी.एफ.सी स्टार मानांकनासाठी अनुषंगिक खर्च करणे, श्री आकाश किसन हासे यांनी शहर समवयक या कंत्राटी पदावर मुदतवाढ मिळणे,  तळोदा नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील सन 2020-21 घनकचरा व्यवस्थापन मक्ता दि.24 एप्रिल 2021 रोजी संपला आहे. तरी दिनांक 25 एप्रिल 2021 पासून पुढील मक्ता होईपावेतो शहरातील गटारीचा गाळ गोळा करणे व कचरा गोळा करणेकामी दोन मोठे ट्रॅक्टर दोन वाहनचालकासह भाड्याने लावणे कामी कार्योत्तर मंजुरी बाबत विचार विनिमय करणे, नगर परिषद आरोग्य विभागातील सर्व वाहनांचा विमा उतरविणे, नगर परिषद आरोग्य विभागातील घंटागाडी नंबर 1 ते 5 दुरुस्ती होणेबाबत, कालबद्ध सुधारित आश्वासित प्रगती योजनेनुसार एकाकी पदांना लाभ देण्याकरिता वर्ग -3 व वर्ग-4 मधील तळोदा न.प कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालविण्याबाबत शासन निर्णय लागू करणे, पाईप गटारी साईटच्या जागेत किरकोळ फेरबदल करणे, 
               महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 1) श्रीराम नगर, सूर्यवंशी नगर, सुशीला पार्वती नगर, दामोदर नगर, विद्यानगरी नेमसुशिल नगर मधील मोकळ्या जागेत तारेचे कुंपण करून झाडे लावणे व संवर्धन करणे, 2) सिताई नगर विष्णूलता भिकाजी नगर, श्रीजी पार्क मधील मोकळ्या जागेत झाडे लावून संवर्धन करणे, 3) नवीन वसाहतीत कच्चे रस्त्यांवर मुरूम टाकणे, तळोदा नगरपरिषदेचे स्वच्छ महाराष्ट्र / स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण सन 2021 - 22 चे कामांचे जनजागृती करण्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबत विचारविनिमय करणे, 1) प्रताप नगर अंतर्गत विंधन विहिरीचा ठिकाणी थ्री फेज वीज जोडणी करणे, 2) गडी मागील भागात विंधन विहिरीचा ठिकाणी थ्री फेज वीज जोडणी करणे, 2)  गडी मागील गंजीच्या भागात विंधनविहीरच्या ठिकाणी थ्री-फेज वीज जोडणी करणे, व पाईप लाईन करणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडील शासन परिपत्रक तसेच नगर विकास विभाग यांच्याकडील शासन परिपत्रक अन्वये लाड कमिटीचा शिफारसीनुसार वारसा वशिला हक्काने सफाई कामगार पदावर नियुक्ती करणेवल अश्या विविध चौदा महत्वपूर्ण विषयांवर विचार विनिमय करून चर्चा करण्यात आली. 
            दरम्यान पालकमंत्र्यांकडून शहराच्या विकासासाठी उपलब्ध झालेल्या सात कोटी निधीसाठी आभार पत्र सादर करण्याचे मत ऑनलाइन सभेत गौरव वाणी यांनी मांडले नगरसेवकांनी नाहरकत दर्शवत अजय परदेशी यांनी तात्काळ विषयास अनुमती देत पत्राची कार्यवाही बाबत आदेशीत केले. साथ रोगाचा अनुषंगाने शहरात फवारणी करणे, तसेच तज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करून त्यांच्या सल्ल्यानुसार पालिकेकडून उपाययोजना करणे संदर्भात जितेंद्र सूर्यवंशी यांनी सुजाव मांडले.
          या ऑनलाइन सभेत उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, भास्कर मराठे, रामानंद ठाकरे, सविता पाडवी, सुरेश पाडवी,बेबीबाई पाडवी, योगेश पाडवी, अमानुद्दीन शेख, शोभा भोई, अंबिका शेंडे, काँग्रेसचे नगरसेवक संजय माळी, जितेंद्र सूर्यवंशी, हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, कल्पना पाडवी आदी सहभागी होते. ऑनलाइन सभा यशस्वीतेसाठी नगराध्यक्ष अजय परदेशी, मुख्यधिकारी सपना वसावा  तसेच सभा कामी सचिन पाटील, संगणक अभियंता, नितीन शिरसाठ, अश्विन परदेशी, राजेंद्र माळी यांनी सहकार्य केले. 
        
         
चौकट*** 
या विषयांवर झाले ठिय्या आंदोलन
           एक तास चाललेल्या या ऑनलाइन सभेत चौदा पैकी बारा विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली, त्यापैकी ठराव क्रमांक सहा व चौदा क्रमांकाच्या ठरावांना शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा दुबे यांनी विरोध दर्शवत तीन तास मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या दालना बाहेर ठिया आंदोलन केले. विषय क्रमांक सहा हा आरोग्य निरीक्षक याचा खिसे भरण्यासाठी घेण्यात आला असल्याचा आरोप शिवसेनेने केला, सदरचा मक्ता हा दि. 24 एप्रिल 2021 रोजी संपला असताना तेव्हाच त्यांनी दोन ट्रॅक्टर व दोन वाहनचालक लावण्यासदर्भत मुख्याधिकारी व नगरअध्यक्ष यांचा निदर्शनास का आणून दिले नाही ? असा सवाल उपस्थित केला. याशिवाय तळोदा शहरातील कचरा संकलन करण्याचा ठेका हा 9 सप्टेंबर 2021 रोजी  देण्यात आला असला तर हा ठेका कोणत्या कामासाठी देण्यात आला आहे ?  पांच महिन्यानंतर बिल काढण्यासाठी सर्वसाधारण सभेत कार्योतर मंजुरीसाठी का ठेवण्यात आला ? अगोदर काम करून घेणे व नंतर निविदा प्रक्रिया राबवणे व मनाला वाटेल तसे बिल काढणे हे तळोदा नगर पालिकेत सतत घडत असून वारंवार तक्रार करून देखील अधिकाऱ्यांवर कार्यवाही का होत नाही? 
                 याशिवाय विषय क्रमांक चौदा हा प्रशासकीय अधिकारी यांचा रिपोर्ट व विशेष सहाय्यक विभाग याचा कडील शासन परिपत्रक तसेच नगर विकास विभाग कडील शासन परिपत्रक अन्वये लाड कमिटीच्या शिफारशी नुसार वारस वशिला हक्काने सफाई कामगार पदावर नियुक्ती करणे बाबतचा विषय मी स्वतः सर्वसाधारण सभेत घेतला आहे,असे सांगत जोपर्यंत नगर पालिकेतील सफाई कामगार हा निवृत्ती घेत नाही किंवा होत नाही तो पावेतो सदर विषय कसे घेऊ शकतात  असा देखील प्रश्न उपस्थित केला.शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आलेले चुकीच्या विषयांना स्थगिती द्यावी व ज्या अधिकाऱ्यांनी सदर विषय सर्वसाधारण सभेत ठेवले आहेत त्यांचावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा तळोदा शहर शिव सेना तीव्र असे आंदोलन करण्यात येईल या आशयाचे पत्र नगर पालिकेच्या मुख्याधिकारी सौ सपना वसावा याना देऊन संबधीतांवर योग्य कार्यवाही व्हावी यासाठी शिसवेनेचे नगरसेविका प्रतीक्षा दुबे, शहर अध्यक्ष जितेंद्र दुबे, आनंद सोनार, संजय पटेल, श्रावण तिजविज, सुरज माळी, कल्पेश माळी, दिपक मोरे, जयेश सूर्यवंशी, जगदीश परदेशी, विजय मराठे आदींनी मुख्याधिकारी यांना दालनाच्या बाहेर तीन तास ठिया आंदोलन केले...

चौकट***
           शिवसेना नगरसेविका यांनी  सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक 6 व 14 बाबत घेतलेल्या हरकती संदर्भात पालिकेने पत्र देऊन सदर बाबींचा खुलासा केला आहे. विषय क्रमांक 6 बाबात म्हटले आहे की, दि. 24 एप्रिल 2021 रोजी सन 2020-21 घनकचरा व्यवस्थापन मक्ता संपुष्टात आला आहे. तरी शहरातील कचरा संकलन, गाळ गोळा करणे वाहतूक करणे कामी दोन ट्रॅक्टर व दोन ड्रायव्हर भाडेतत्त्वावर लावणे कामी दि 07-05 2021 रोजी स्थायी समितीची मंजुरी तसेच दिनांक 26-4-2021 रोजी वृत्तपत्रात जाहीर निविदा प्रसिद्ध करून निविदा प्रक्रिया केली असून  सदरील काम शहरातील आरोग्याच्या दृष्टिकोनातून व कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने केले आल्याचे म्हटले आहे.
          याशिवाय विषय क्रमांक 14 बाबत घेतलेल्या हरकतीच्या अनुषंगाने सफाई कामगार हा निवृत्ती घेत नाही किंवा निवृत्त होत नाही तेव्हा पर्यंत आपण सदरील विषय कसा घेऊ शकतात? विषय क्रमांक 14 बाबत तळोदा नगर परिषदेतील सफाई कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती होणे कामी  कार्यालयात अर्ज सादर केलेला आहे तसेच स्वेच्छानिवृत्ती दिल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर त्यांचे वारसांना सफाई कामगार म्हणून निवृत्त देणे कामी अर्जात सदरील विषय सर्वसाधारण सभेत घेण्याची विनंती केली असल्याचे म्हटले आहे.

प्रतिक्रिया***
           स्वच्छतेचा ठेकेकामीं तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळणेसाठी विलंब झाल्यामुळे शहर अस्वच्छ होण्याच्या शक्यतेपोटी 2 ट्रॅक्टर वाहन चालकांसह लावण्याचा निर्णय स्थायी समितीत घेतला आहे. सदर कामाचा खर्च 1 लाखापेक्षा अधिक जात असल्याने नियमानुसार कार्योतर मंजुरीसाठी शुक्रवारी आयोजित सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. 

अजय परदेशी 
लो.नगराध्यक्ष तळोदा

प्रतिक्रिया***
            तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळणेसाठी विलंब झाल्याने ट्रॅक्टर व वाहन चालकांना लावणे अत्यावश्यक असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करून ट्रॅक्टर व वाहन चालकांना लावले आहे. त्यामुळे जनरल बैठकीत हा विषय विलंबाने घेण्यात आला आहे. 

सपना वसावा 
मुख्याधिकारी न.पा.तळोदा





0 Response to "शिवसेनेच्या नगरसेविका व पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकारी यांच्या दालना समोर तीन तास ठिय्या आंदोलन"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article