दरम्यान,पीक अप चालकाने 80 फुटी रस्त्यावरून वाहन वळवत भन्साली प्लाझा समीरला मेन रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांना धडक देण्याची सुरू झालेली मालिका सत्यम हॉटेलचा कॉर्नर पावेतो संपल्याने पुढील अनर्थ टळला. या थरारात वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत होता. मद्यपी चालक मौहऱ्या जुग्या वसावे रा. नर्मदानगर वय 38 याने 2 वाहन चालकांना जबर ठोस दिली आहे. दरम्यान या धडकेत मुस्तकीन शेख मुयोद्दीन 45 रा. इलाहीचौक हा जबर जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. हातगाडीवर कपडे विक्री करणारा अनिल रेमश भांडारकर वय 37 मोठामाडी वाडा यास देखील डोक्याला व हातापायाला जबर मार लागल्याने त्यास स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांना त्यास तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. तर रस्त्यावर उभ्या असलेल्या 4 मोटार सायकल, बालाजी वेफर्स विक्रर्त्याचे मॅक्स वाहन, एक सायकल, स्कुटर, विक्रीसाठी ठेवलेली टपरी व रस्त्यावरील वाहनाना धडक देऊन नुकसान केले आहे. दरम्यान वाहनांना धडक दिली असता तो न थांबताच पुढे सुसाट निघाला होता. कैन्हयालाल श्रवनलाल कुमावत रा. श्रेयस कॉलनी याचे mh 39 Q 7626 हे वाहन नाजीम हॉटेल परिसरात उभे होते. दरम्यान सदर भरधाव येणाऱ्या पिकअपने ते वाहन फरफटत साधारणतः 100 ते 200 मीटर हॉटेल सत्यम पावेतो नेले.
दरम्यान सदर वाहन हे पुढील चाकात अडकल्याने वाहनांची गती कमी झाल्याने वाहन त्याठिकाणी येऊन थांबले. संजय बिअरबार पासून ते ख्वाजा नाईक चौका पावेतो रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना धडक देत वाहनांचे नुकसान केले. दरम्यान या थरारक प्रसंग अनुभवताना रस्त्यावरील नागरिकांच्या जीव मुठीत होता. घटनेबाबत माहिती कळताच घटनास्थळी सहायक पो.निरीक्षक अमितकूमार बागुल, सहायक पो.उपनिरीक्षक अविनाश केदार, अजय कोळी, अजय पवार, पो.काँ. युवराज चव्हाण, दिलीप साळवे, सुभाष पावरा, आनंदा पाटील, दारासिंग पावरा, वाहतूक शाखेचे कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी पांगवली.
तावडीत सापडताच दिला चोप
दरम्यान शहरातील मुख्य मार्गावरील असलेल्या नागरिकांनी त्याला लागलीच पकडून चांगलाच चोप देऊन त्यास तळोदा पोलीसांच्या ताब्यात दिले. दरम्यान वाहन चालकास किरकोळ दुखापत झाल्याने व वैद्यकीय तपासणीसाठी त्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पंचनामा न करताच उचलली वाहने*
घडलेल्या प्रकारात गौर गरिबांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता सरसकट वाहने पोलीस ठाण्यात आणून जमा केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
लोकप्रतिनिधीही धावले मदतीला
सदर घटना घडल्यानंतर तळोदा शहरातील लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिक धावून आले. नगरसेवक गौरव वाणी, सुभाष चौधरी, जितेंद्र सूर्यवंशी, जालंधर भोई, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक अमानुदिन शेख, आदिवासी युवासेनेचे उपाध्यक्ष विवेक पाडवी, शिवसेनेचे श्रावण तिजविज, आनंद सोनार, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष कुणाल चौधरी, शिवसेनेचे शहर अध्यक्ष जितेंद्र दुबे, कृ.उ.बा.समितीचे संचालक भरत चौधरी, संजय पटेल, जयेश सूर्यवंशी, सूरज माळी, पुत्तन दुबे, कल्पेश सूर्यवंशी यानी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली..
0 Response to "तळोद्यात भरधाव पीकअपचा बाजारातील वाहनांना धडकेचा थरार..."
टिप्पणी पोस्ट करा