संपर्क करा

कोविड कालावधीत रुग्णांना उत्तम सेवा देणाऱ्या तळोदा सुपुत्राचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

कोविड कालावधीत रुग्णांना उत्तम सेवा देणाऱ्या तळोदा सुपुत्राचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

तळोदा : कोविड महामारीच्या काळात नंदुरबार जिल्हयात रुग्णांना चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देवून अनेकांचे प्राण वाचविले यासाठी नवभारत हेल्थकेअर अवॉर्ड मध्ये एक्सलन्स इन कोविड केअर या इंडिव्हिज्युअल कॅटेगिरीतून राज्यपाल भगतसिंग कोशारी व महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे तळोदा येथील सुपुत्र डॉ.गौरव तांबोळी यांना सन्मानित करण्यात आले.       
              डॉ. गौरव तांबोळी हे महाराष्ट्राच्या अतिदुर्गम भागातील नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यातील तळोदा शहरातील असून सेवानिवृत्त सहा. प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे शिक्षण एमबीबीएस, एम डी मेडिसिन पर्यंत आहे. मुंबईतील जसलोक या नामांकित हॉस्पिटल मध्ये  वैद्यकीय सेवा देत होते. महामारीचे संकट लक्षात घेऊन खास नंदुरबार जिल्हा वासियांच्या सेवेसाठी नोकरी सोडून आले. जिल्ह्यातील पहिले व्हेंटिलेटरसह आय. सी. यु., आय. पी. डी, ओपीडी उपचार सुविधा असलेले स्मित मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरु करून जवळपास 5000 रुग्णांना जीवदान देणारे कार्य केले. डॉ गौरव तांबोळी यांना सन्मान मिळाल्याबद्दल डॉक्टर्स, सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील मंडळी, विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्थेतील कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

0 Response to "कोविड कालावधीत रुग्णांना उत्तम सेवा देणाऱ्या तळोदा सुपुत्राचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article