तळोदा पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाले नवीन वाहन
तळोदा : तालुक्यातील गुन्हेगारीला आळा बसविण्याबरोबरच जनतेच्या सुरक्षेची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलाला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने तळोदा पोलीस दलाच्या ताफ्यात आता नवीन अद्ययावत वाहन सामील झाले आहे. त्यामुळे अत्यंत आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.
तळोदा तालुका पोलीस ठाण्याला नवीन वाहन उपलब्ध झाल्याने तहसीलदार गिरीश वखारे व पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांचा हस्ते पूजन करण्यात आले. तळोदा पोलीस ठाण्याला नवीन बुलेरो वाहन जिल्हा स्थरावरून प्राप्त झाले आहे. वाहनचालक रविंद्र पाडवी व चंद्रसिंग वसावे यांनी वाहन मिळाल्याने आनंद व्यक्त केला. या आगोदर जूने वाहन नेहमी नादुरुस्त होत असत ते वाहन केव्हाही कुठेही रात्री अपरात्री नादुरुस्त होत होते त्यामुळे त्यांना व त्यांचा सोबत आलेल्या अधिकाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले. वाहनाची पुजन तहसीलदार गिरीश वखारे व पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांचा हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सहायक पो.नि अमित बागुल, पो. उपनिरीक्षक अविनाश केदार, वाहन चालक रवींद्र पाडवी, पो.ना अजय कोळी, पो.ना.अजय पवार, हे.को सुनील मोरे, वाहतूक पोलीस विलास पाटील, उमेश चौधरी, दिलीप वसावे, तारसिंग पावरा, वाहन चालक चंद्रसिंग वसावे, सुभाष पावरा, मंगला पाडवी आदी उपस्थित होते.
चौकट***
तळोदा तालुक्यातील १२८ गाव पाडे पर्यंत पोचण्यासाठी तळोदा पोलिसाच्या ताफ्यात एकच वाहन होते. एकाच वेळेस इतर ठिकाणी घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोहचण्यासाठी पोलिसाची चांगलीच तारांबळ उडते किंवा पोलिसांना दुचाकीचा मार्ग अवलंबा लागत होता मात्र जिल्हा प्रशासनाकडून वाहन उपलब्ध झाल्यामुळे पोलिसांची गती वाढण्यास मदत मिळाली आहे..
0 Response to "तळोदा पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाले नवीन वाहन"
टिप्पणी पोस्ट करा