ग्रामीण भागातील जीर्ण तार व विद्युत पोल बदलण्याच्या आम.पाडवी यांच्या आढावा बैठकीत सूचना
तळोदा : ग्रामीण भागात पाणी टंचाई भासू नये, यासाठीच पूर्व नियोजन करण्यासाठी शुक्रवारी तळोदा आदिवासी सांस्कृतिक भवनात आमदारांनी पाणी टंचाईसह विविध विकासकामांची माहिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीत रस्ते, पाणी, विद्युत समस्या व घरकुल या विषयांवर विशेष भर देण्यात आला.
आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक येथे पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार गिरीश वखारे, गट विकास अधिकारी रोहिदास सोनवणे, प.स सभापती यशवंत ठाकरे, जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता आर दरेवार, भु.वैज्ञानिक श्रीमती गांगुर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, वनक्षेत्रपाल निलेश रोडे, नियोजन अधिकारी निर्मल तोरवणे, आदिवासी विकास प्रकल्पचे सहायक पक्रल्प अधिकारी अमोल मेटकर, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, स्वीय सहायक विरसिंग पाडवी, आदिवासी महीला आघाडीच्या शानुताई वळवी या यासह तालुक्यातील प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, वनरक्षक, प.स सदस्य विजय राणा, दाज्या पावरा, विक्रम पाडवी, भरत पवार, प्रकाश वळवी, जिप सदस्य,पंचायत समिती सदस्य, सरपंच, आदी उपस्थित होते....
या बैठकीत तळोदा तालुक्यातील 62 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक सरपंच व प्रशासकांनी आपापल्या गावातील पाणी टंचाईबाबत माहिती दिली. दरम्यान जवळपास ९० टक्के गावे पाणी टंचाईपासून मुक्त असल्याचे आढळले. काही ठिकाणी विहिरी आहेत मात्र मोटार व केबलमुळे प्रकल्प रखडले आहेत. काही ठिकाणी पाणी पातळी खालावली आहे. तर काही ठिकाणी रोहित्र लवकर मिळत नसल्यामुळे कुत्रीम पाणी समस्यां उदभवत असल्याचे सांगण्यात आले. याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता चहांदे यांनी लक्ष देऊन रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आमदारांनी सुचविले.
उर्वरित १० टक्के गावात माळखुर्द, चौगाव, अलवान, केलीपाणी, विहरिमाळ, शितापावली, शिंदमाळ, मोकसमाळ, मोठीबारी, हातबारी, नयामाळ, गढावली, केलवापाणी, गायमुख, कुयलीडाबरी, पाल्हाबारी, रावलापाणी, एकधड, सोजरबार, बियामाळ येथील ग्रामसेवकानी पाणी समस्या मांडल्या. जलजीवन मिशन अंतर्गत आराखडा तयार करून पाठविला असल्याचे सांगितले. मात्र रस्तेच नसल्याने याठिकाणी सुविधा देणे अवघड आहे. पुढील बैठकीपूर्वी त्यांचे निरसन करून आवश्यक तो मार्ग काढण्याच्या सूचना आमदारांनी दिले.
यासह विकास कामे, प्रलंबित कामे, आवश्यक कामे, घरकुल व इतर समस्याच्या आढावा जाणून घेतला. अलवान ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल लाभार्थ्याचे 220 प्रकरणे अपात्र ठरले असल्याचे सांगण्यात आले, तांत्रिक बाबीमुळे पात्र लाभार्थी अपात्र ठरत असतील तर स्थानिक प्रशासनाने त्यांच्या तांत्रिक दुरुस्त्या दूर करून ग्रामसेवकांनी चौकशी करून पुरतता करण्याच्या सूचना दिल्या..
याशिवाय तालुक्यातील बहुतांश गावामध्ये मागील 50 ते 60 वर्षांपूर्वीचे वीद्युत खांब व तार असल्याने जीर्ण झाले आहेत. त्या तातडीने बदलणे अपेक्षित असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. याशिवाय तालुक्यातील बहुतांश गावात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रोहित्रची क्षमता वाढवून मिळणेबाबत मागणी केली. चार तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत खराब रस्ते, वाहून गेलेले रस्ते व नादुरुस्त फरशी पूल या संदर्भात ही समस्यां मांडण्यात आल्या. बैठकीचे सूत्रसंचालन मुकेश कापुरे, प्रास्ताविक तहसीलदार गिरीश वखारे तर आभार गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे यांनी मानले...
*नयामाळ गावचे पुनर्वसन करणार*
इच्छागव्हान ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 173 लोकसंख्या असलेल्या हातबारी येथे झऱ्यातून पाणी घ्यावे लागते. रस्ते नसल्याने मजुरामार्फत विहिर करणे केवळ हाच एकमेव पर्याय आहे. तसेच 200 लोकसंख्या असलेल्या नयामाळ येथे देखील विद्युत व्यवस्था नाही, त्याठिकाणी रस्ते नाहीत, जाण्यासाठी कुंडवे मार्गे डोंगर चढून जावे लागते, त्याठिकाणी लोकांना पुनर्वसन करणेसाठी आमदार यांनी पुढाकार घेतला असून त्यांना जागा उपलब्ध करून मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे पुनर्वसन करून शाळा, आरोग्य, विज, रस्ते अश्या सर्वच मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. ग्रामस्थांची मनधरणी करून त्यांना जागा निवडीसाठी आवाहन करण्याचे आमदार पाडवी यांनी ग्रामसेवक शीतल तळवी यांना सांगितले.
*प्रलंबित वनदावे मंजूर करण्याची मागणी*
प्रलंबित वनदावेबाबत तातडीने मार्ग काढणेसंदर्भात सभापती यशवंत ठाकरे यांनी वनविभागातील कर्मचाऱ्यांवर ताशोरे ओढून संताप व्यक्त केला. दरम्यान विरसिंग पाडवी यांनी याबाबत स्वतंत्र कॅम्प लावून लवकरात लवकर विषय मार्गी लावण्याच्या सूचना मांडल्या..
*गटारी बनविण्यासाठी विशेष तरदूत करण्याची मागणी*
तळोदा तालुक्यातील बोरद, मोड, आमलाड, तळवे, रांझनी, प्रतापपुर, धानोरा, गंणेश बुधावल, मोदलपाडा यासह तालुक्यातील मोठ्या गावामध्ये गटारी जीर्ण झलेल्या आहेत त्यांचे नूतनीकरण व लांबी रुंदी वाढविणे गरजचे झाले आहे. ग्रामपंचायततिकडे प्राप्त निधीतून सदर कामे करणे अवघड आहे. त्यामुळे वरीष्ठ पातळीवरून सदर कामे हाती घेऊन त्यावर मार्ग निघावा अशी अपेक्षा प.स सदस्य दाज्या पावरा यांनी व्यक्त केली.
*ड- यादीबाबत लिखित स्वरूपात सूचना देण्याची ग्रामसेवकांची मागणी*
घरकुल संदर्भात ड- यादीचा मुदा चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वेक्षण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत झाले आहे. व सुटलेल्या नावांची जबाबदारी ग्रामपंचायतीवर लादली जात आहे. याबाबत योग्य त्या सूचना लिखित स्वरूपात मिळाव्यात अशी मागणी ग्रामसेवकाकडून करण्यात आली....
0 Response to "ग्रामीण भागातील जीर्ण तार व विद्युत पोल बदलण्याच्या आम.पाडवी यांच्या आढावा बैठकीत सूचना"
टिप्पणी पोस्ट करा