संपर्क करा

आम राजेश पाडवीचे राणीकाजल मातेला साकडे: बरसला वरून राजा, मुसळधार पावसाने सर्वत्र समाधान

आम राजेश पाडवीचे राणीकाजल मातेला साकडे: बरसला वरून राजा, मुसळधार पावसाने सर्वत्र समाधान

तळोदा : यंदाच्या वर्षी दडी मारणाऱ्या वरुणराजाने मुसळधार हजेरी द्यावी यासाठी आमदार राजेश पाडवी व परिसरातील पुरुष महिलानी सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या राणीपूर येथील राणी काजल मातेची पायी वारी केली़. देवीला साकडे घालून ‘पाऊस पडू दे’ अशी आर्त करत महिला व युवतींनी येथे पूजन केल़े.. 

             शेकडो वर्षापूर्वी पासून या निसर्ग देवतेचे पुजन या ठिकाणी होत आहे. या पुजेत खरिप हंगामापूर्वी गाव पुंजारांकडून मातेला वर्षभर गावात सुखशांती लाभू दे, चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांचे सर्व पिके निरोगी राहू दे, चांगले अन्नधान्य पिकू दे व गाव परिसरातील सर्व सजीवांना निरोगी राहु दे, असे साकडे घातले जाते त्या अनुषंगाने पारंपरिक प्रथेनुसार तालुक्यावर आलेले संकट दूर व्हावे यासाठी आम.राजेश पाडवी यांनी  मातेचे पूजन करून साकळे घातले. याप्रसंगी परिसरातील 500 तर 600 महिला पुरुष उपस्थित होते.
    
       तळोदा तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाऊस नसल्याने वातावरणात बदल होऊन उष्णतेत वाढ झाली आह़े परिणामी कोवळी पिके करपू लागली आहेत़ कापसासह तूऱ केळी, ज्वारी यासह इतर पिकांची दयनीय स्थिती झाली आह़े. पाण्याची पातळी आधीच खोल गेल्याने शेतकरी हैराण झाले आहेत़. पावसाचे दमदार पुनरागमन व्हावे यासाठी शनिवारी  सकाळी राणीपुर, सोमावल, सोरापाडा, लहान सोमावल, अमलपाडा, नळगव्हान, राजविहिर, बुधावली, काकलपूर यासह परिसरातील गावातील महिला आणि युवतींनी राणीकाजल मातेला नवस बोलून राणीपुर गावाच्या शिवारापासून ते राणिपूर येथील राणीकाजल मंदिरार्पयत पायी वारी काढली़ 

              सवाद्य काढलेल्या मिरवणूकीत महिलांनी डोक्यावर पाण्याने भरलेला कळस घेत पारंपरिक गीते गाऊन वाट धरली होती़. पुंजारी पुसाराम पाडवी यांच्या हस्ते मातेचे पूजन करण्यात आले. राणीपूर येथील राणीकाजल देवीला साकडे घातल्यास हमखास पाऊस येतो अशी धारणा असल्याने साधारणतः परिसरातील 500 ते 600 महिला व युवतींनी ही पायी वारी केली़ राणीपूर येथील मंदिरावर पोहोचल्यानंतर घरुन सोबत घेतलेल्या पाण्याने देवीच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यांनतर मंदिरावर प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली़.

           सदर मिरवणुक आम.राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात निघाली त्यांच्यासह माजी जी.प. सदस्य  सतीश वळवी, श्रीमती शानुबाई वळवी, जिप सदस्य संगीता वळवी, जिप सदस्य इलाबाई पवार, राणीपुर सरपंच सुशीला वळवी, उपसरपंच निर्मला वसावे, भाजप आदिवासी मोर्चाचे उपाध्यक्ष दरबारसिंग पाडवी, तालुका उपाध्यक्ष अशोक वळवी, राणीपुर सदस्य ग्रा.सदस्य प्रकाश वळवी, भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस श्रीमती सपना वळवी, तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी, उपाध्यक्ष छगन कोठारी, विरसिंग पाडवी, विठ्ठल  बागल, प्रवीण वळवी, संगदेव वळवी, ग्रा.सदस्य राणीपुर, दिनेश ठाकरे, गुड्डू वळवी, संदीप वळवी, अजय पाडवी, सुरेश वळवी, इत्यादी उपस्थितीत होते....

 चौकट***
                दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास  साधारण ६ वाजेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तालुक्यात मागील एक ते दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. आज मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुकावला आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली होती. पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला असून सोयाबीन, तूर, मका, कापूस, ऊस, केळी, मिरची या पिकांना जीवदान मिळाले आहे. कडक उन्हामुळे सर्वजण हैराण झाले होते. त्यामुळे सर्वांनाच पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा लागून होती. अखेर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना चांगलाच दिलासा मिळाला असून पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे.

0 Response to "आम राजेश पाडवीचे राणीकाजल मातेला साकडे: बरसला वरून राजा, मुसळधार पावसाने सर्वत्र समाधान"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article