धुळे जिल्हाधिकारीपदी जलाज शर्मा तर नंदुरबार जिल्हाधिकारीपदी मनीषा खत्री
तळोदा: पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात केली असून शुक्रवारी सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.
त्यानुसार अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव विकास पाटील यांची कोकण विभागीय आयुक्तपदी बदली झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांची मंत्रालयात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या श्रीमती विमला आर.यांची वर्णी नागपूर जिल्हाधिकारीपदी लागली आहे.रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली पुणे महानगर परिवहन मंडळात अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली आहे.नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांची नियुक्ती आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे करण्यात आली आहे.नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलाज शर्मा यांची बदली धुळे जिल्हाधिकारीपदी तर आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा खत्री यांची नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
0 Response to "धुळे जिल्हाधिकारीपदी जलाज शर्मा तर नंदुरबार जिल्हाधिकारीपदी मनीषा खत्री"
टिप्पणी पोस्ट करा