संपर्क करा

सहयोग सोशल ग्रुपतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ११२ दात्यानी केले रक्तदान

सहयोग सोशल ग्रुपतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ११२ दात्यानी केले रक्तदान

तळोदा :  गेल्या दीड वर्षापासून देशभर कोरोनाविषाणू थैमान घातला आहे. कोरोना विषाणू ची दुसरी लाट भयंकर होती. त्यामुळे शासनाला पुन्हा एकदा काही काळ लॉक डाऊन जाहीर करावे लागले .या काळात अनेक गरजू रुग्णांना रक्ताची गरज भासली त्या सर्वांना रक्तपेढीतील रक्ताचा साठा वापरण्यात आला .आता मात्र रक्तपेढीत अत्यंत अल्प साठा शिल्लक आहे .जिल्हा आरोग्य प्रशासनाद्वारे रक्तपेढीत एक दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक असल्याचे स्पष्ट केले आहे .त्यामुळे रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन करण्यात आले .
      आपल्या नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल व  रक्तक्षय यांसारख्या आजाराचे रुग्ण अधिक आहेत त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील रक्तदान शिबिराची आवश्यकता लक्षात घेऊन विविध सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या सहयोग सोशल ग्रुप तळोदा द्वारे दिनांक २९/६/२१ रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. दरवर्षी डॉक्टर्स डे निमित्त सहयोग सोशल ग्रुप तळोदा वेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. 
                रक्तदान शिबिर कार्यक्रमात *प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्री गिरीश वखारे साहेब ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण ,वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पाटील यांना आमंत्रित करण्यात आले*. सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत वृक्ष देऊन अनुक्रमे ॲड.अल्पेश जैन डॉ.संदीप जैन, डॉ.महेश मोरे यांच्या मार्फत  करण्यात आले.तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले तहसीलदार श्री गिरीश वखारे साहेब यांनी रक्तदानाचे महत्त्व व त्याविषयी आवश्यकता यासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले व स्वतः रक्तदान करुन एक आदर्श सर्वासमोर ठेवला. तसेच विविध समाज कार्यात अग्रेसर असणारे सहयोग सोशल ग्रुप यांचे मनस्वी कौतुक व आभार मानले.  डॉ. योगेश बडगुजर  यांनी रक्तदान कोणी करावी रक्तदान केल्याने होणारे फायदे तसेच रक्तदानाविषयी असणारे समज-गैरसमज याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील लोखंडे यानी केले. *रक्तदान शिबिरात एकूण 112 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला* . रक्तदान शिबिरात स्रियानी व प्रशासकीय कर्मचारी यानी सुध्दा सहभाग नोंदवला.प्रत्येक रक्तदात्यांना पावसाळी वातावरण असल्याने सहयोग सोशल *ग्रुप तर्फे छत्री भेटवस्तू म्हणून देण्यात आली. भेटवस्तू* चे वाटप मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.  सर्व रक्तदात्यांची आरोग्य तपासणी डॉ. महेश मोरे व डॉ.
 संदीप जैन  यांच्या द्वारे करण्यात आली.रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात *वैद्यकीय  अधीक्षक डॉ विजय पाटील  म्हणाले* ,रक्तदान शिबिराचे आयोजन सहयोग सोशल ग्रुप तळोदा यांनी अत्यावश्यक वेळी घेतल्याने शिबिराचे अनेक गरजू रुग्णांचे प्राण  वाचवण्यात मदत होईल. तसेच माणुसकी धर्म पाळणाऱ्या व सामाजिक जाणीव  ठेवणाऱ्या सहयोग सोशल ग्रुपचे आभार मानले. 
                 कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे व सर्व रक्तदात्यांचे आभार प्रदर्शन सहयोग सोशल ग्रुप चे अध्यक्ष ॲड. अल्पेश जैन यांनी केले. रक्तदान शिबिर हे कोरोना काळातील सर्व प्रशासनाच्या नियमांचे पालन करून यशस्वी रित्या घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ऍड.अल्पेश जैन ,उपाध्यक्ष डॉ संदीप जैन ,सचिव डॉ. सुनील लोखंडे ,कोषाध्यक्ष डॉ. योगेश बडगुजर, सहसचिव डॉ.महेश मोरे व महेंद्र सूर्यवंशी, गुड्डु जिरे , राहुल पाटील , रवी चव्हाण , सोहेल मंसुरी, राकेश भोइ , देवेंद्र चव्हाण , गणेश पाटील व पलाश जैन ,  इत्यादी सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

0 Response to "सहयोग सोशल ग्रुपतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ११२ दात्यानी केले रक्तदान "

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article