विना परवाना दारू विक्री प्रकरणी तऱ्हाद येथील एकास अटक
तळोदा:-विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने आपल्या कब्जात 60 लिटर 1200 रुपयांची गावठी हात भट्टी दारू मिळून आल्याने तऱ्हावद पुनर्वसन येथे पोलिसांनी कारवाई केली एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तळोदा तालुक्यातील तऱ्हावद पुनर्वसन विनापरवाना गावठी हात भट्टी दारू विक्री करण्याचा उद्देशाने उदेसिंग जेमऱ्या वसावे हा ताब्यात बाळगतांना मिळून आला त्याच्या ताब्यात 60 लिटर 1200 रु किमतीची गावठी दारू जप्त केली ही कारवाई तळोदा पोलिसांनी दिं.29 रोजी सायंकाळी केली पो.कॉ. तुकाराम पावरा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात उदेसिंग वसावेB यांच्या विरोधात गु.र.नं 406/2021 म.दा.का.कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास पो.हे.कॉ. प्रकाश चौधरी हे करीत आहे...
0 Response to "विना परवाना दारू विक्री प्रकरणी तऱ्हाद येथील एकास अटक"
टिप्पणी पोस्ट करा