संपर्क करा

माझे वडील हेच माझे शिल्पकार : अविशांत पंडा IAS

माझे वडील हेच माझे शिल्पकार : अविशांत पंडा IAS

अविशांत पंडा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा 

            माझे वडील हे माझ्या जीवनाचे शिल्पकार आहेत. ते देखिल 1984 बॅच आयएएस अधिकारी होते. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. तेच माझे आद्य गुरू आहेत. मी लहान असल्यापासून त्यांना माझा माझा गुरू मानतो. बालपणीपासून तर तारुण्यावस्थेत पर्यत मी बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून शिकत आलो आहे. त्याच्याकडून मला काही तरी नविन करण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळाली आहे. वेळोवेळी बराच सल्ला आणि मार्गदर्शन मिळाले आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असतांना देखिल त्यांचे गुरुमंत्र नेहमीच  उपयुक्त ठरत असतात. त्यांनी दिलेली शिकवण खूप मोलाची आहे. ते नेहमी म्हणतात की, 'प्रथम, आपण नेहमीच स्वतःशी प्रामाणिक असले पाहिजे आणि आपली कर्तव्ये पूर्ण क्षमतेने,१०० टक्के योगदान देऊन पूर्ण केली पाहिजेत." आणि दुसरे म्हणजे,"जो कोणी सल्ला घेण्यासाठी येतो किंवा समस्या आणतो,त्या व्यक्तीची समस्या आपण त्याच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे." त्यांनी दिलेली ही शिकवण मला खरोखरच मनापासून आवडली आणि मी ती कृतीत अनुवादित केली.त्यांनी ही तत्वे स्वतः आचरणात आणली.त्यांनी दिलेली शिकवण व तत्वे माझ्यासकट आमच्या सर्व  कुटुंबातील सदस्यांनी अंतःकरणापासून स्वीकारली आहेत किंबहुना प्रत्येकाने आपल्या हृदयावर ती कोरून ठेवली आहेत.
            हे आयएएस अधिकारी बनने ही एक प्रकारची
मॅरेथॉन स्पर्धा असल्याचे त्यांनी मला सांगितले.हे यश केवळ  मेहनत, संयम व दृढ निश्चयानंतरच प्राप्त होते.हे त्यांनी माझ्या मनावर कोरले व माझ्याकडून त्यांनी हे यश संपादित करून घेतले.त्यासाठी त्यांच्याकडून मला निरंतर प्रोत्साहन मिळाले.माझ्या दैनंदिन अभ्यासामध्ये त्यानी कधीही जास्त हस्तक्षेप केला नाही.परीक्षेच्या वेळी देखिल आम्ही आमच्या मोकळ्या वेळेत संगीत आणि क्रीडा विषयी चर्चा करायचो. त्यांनी नेहमी मला सकारात्मक मनोवैज्ञानिक पाठिंबा दर्शविला. माझ्या क्षमतेवरही त्यांचा खूप विश्वास होता.त्याच्यामुळे मी घडलो शकलो. आज गुरू पौर्णिमेनिमित्त माझे आद्य गुरू माझे वडीलांना वंदन करतो....

0 Response to "माझे वडील हेच माझे शिल्पकार : अविशांत पंडा IAS"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article