रांझणी शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम : भरदिवसा पडल्या बकरीच्या फडश्या
तळोदा : तालुक्यातील रांझणी येथील शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम असून यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दि.२९ जून रोजी भर दिवसा १२ ते १ वाजेच्या दरम्यान यशवंत उखा बोराणे यांच्या ऊसाच्या बांधावर शिवाजी टेट्या पाडवी यांची बकरी चरत असतांना ऊसाच्या शेतातून बिबट्याचे बकरीवर हल्ला करत मृत्युमुखी पाडल्याने रांझणी शेतशिवारात भर दिवसा बिबट्याचा मुक्त संचाराने शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. सदर घटनेची माहिती कळताच तळोदा वन विभागाचे वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राणीपूरचे वनपाल नंदू पाटील, वनरक्षक विरसिंग पावरा, वनरक्षक राज्या पावरा, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंंचनामा केला.
0 Response to "रांझणी शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम : भरदिवसा पडल्या बकरीच्या फडश्या"
टिप्पणी पोस्ट करा