
राणमाहू येथे भावाचे घराचे पत्रे फोडत असतांना विरोध केला म्हणून महिलेला मारहाण शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी तळोदा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
तळोदा : भावाचे घराचे पत्रे फोडत असतांना विरोध केला म्हणून महिलेला मारहाण शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी राणमहू येथे घडली पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तळोदा तालुक्यातील राणमहू येथील भावाचा घराचे पत्रे फोडत असतांना दोघांना विरोध केला म्हणून महिलेला हातांबुक्याने मारहाण केली पत्रे फोडून नुकसान करीत शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून मायाबाई दिलीप पाडवी यांनी फिर्यादिवरून तळोदा पोलिसात सुभाष वण्या वसावे, राजू बाद्या वसावे रा. राणमहू यांच्या विरोधात पनाका रजि नं.139/2021 भादवी कलम 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील पो.ना.राजधर जगदाळे हे करीत आहेत...
0 Response to "राणमाहू येथे भावाचे घराचे पत्रे फोडत असतांना विरोध केला म्हणून महिलेला मारहाण शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी तळोदा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल"
टिप्पणी पोस्ट करा