तळोदा व मोड येथे घरफोडी करणाऱ्या टोळी जेरबंद : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार व तळोदा पोलिसांच्या संयुक्त कारवाईला यश , 5 लाख 55 हजार 500 रु मुद्देमाल जप्त
तळोदा : तळोदा व मोड येथे दीड महिन्यांपूर्वी झालेल्या 4 घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार व तळोदा पोलिसांच्या संयुक्त कारवाईला यश आले असून चोरीस गेलेल्या माला पैकी 3 लाख 4 हजार रु रोख रक्कम 2लाख 51 हजार 500 रुचे सोने चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख 55 हजार 500 रु मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे कि, तळोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळोदा व मोड येथे एप्रिल व मे महिन्यात घरफोडयांचे सत्र सुरू झाले होते. तळोदा शहरात तीन व मोड येथे एक असे चार बंद घरात घरफोडी झाल्यात चोरट्याने पोलिसात समोर आव्हान उभे केले होते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, स.पो.नि. पाटील, त्यांचे पथक तसेच तळोदा पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे, स.पो.नि. अविनाश केदार, उपनिरीक्षक अभय मोरे यांनी सखोल तपास चक्रे फिरवून गोपनीय बातमीद्वारे छळा लावला.
सदर गुन्ह्यातील जिमी बिपीन शर्मा रा.गुरुकुल नगर नंदुरबार, सागर मोहनलाल जामनानी (सिंधी) रा.जुनी सिंधी कॉलनी नंदुरबार, जय उर्फ ओम्पा गागणदास राजपाल रा.जुनी सिंधी कॉलनी नंदुरबार, कृष्णा शिवदास पाडवी रा.छोटा धनपूर ता.तळोदा, दीपा उर्फ दीपक राजू पाडवी रा. वाघोदा ता.नंदुरबार, फिरोज इस्माईल शेख रा.बागवान गल्ली नंदुरबार, भाया उर्फ शिवदास कुवरसिंग पाडवी रा रोझवा ता.तळोदा या घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यश आल्याने त्यांचे कडून विद्यानगरी, दामोदर नगर तळोदा व मोड गावात दिवसा रात्री घरफोडी केल्याबाबत कबुली दिल्यावरून त्यांच्या विरोधात गु.र.नं.281/2021 भादवी कलम 380, 454, गु.र.नं. 317/2021 भादवी कलम 380, 454, गु.र.नं. 318/ 2021 भादवी कलम 380, 454 ,गु.र.नं.322/2021 भादवी कलम 380, 454 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी 3 लाख 4 हजार रु रोख व सोने चांदीचे 2 लाख 51 हजार 500 रु असा एकूण 5 लाख 55 हजार 500 रु मुद्देमाल जप्त करून हस्तगत करण्यात आला आहे. काही दिवसात 4 घरफोड्या उघडकीस आणल्या आहे म्हणून स्था.गु.अ.चे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व त्यांचे सहकारी व तळोदा पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे व त्याचे सहकारी कामगिरीचे कौतुक होत आहे.
0 Response to "तळोदा व मोड येथे घरफोडी करणाऱ्या टोळी जेरबंद : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार व तळोदा पोलिसांच्या संयुक्त कारवाईला यश , 5 लाख 55 हजार 500 रु मुद्देमाल जप्त "
टिप्पणी पोस्ट करा